पौराणिक कथेनुसार मर्यादापुरुषोत्तम रघुपती श्री रामचंद्रानी रावणाचा पराभव करून असुर शक्तीचा नाश केला आणि चौदा वर्षांच्या वनवास संपवून मता सीतेसह अयोध्येत परतले. त्या दिवशी आयोध्यावासी यांनी तोरण, पाताके लावून गुडी उभारून विजयोस्त्सव साजरा केला. त्या दिवसापासून गुडी उभारण्याची प्रथा प्रस्थापित झाली.
दारी उभारलेली गुडी ही विजय आणि समृद्धीचे प्रतिक मानले जाते. हा गुडी पाडव्याचा उत्सव गोपल्स गार्डन प्री-स्कूल मध्ये दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा करतो.
आपल्या मुलांमध्ये संस्कार आणि संस्कृतीची भावना जागृत करणे आणि त्यांना आपल्या मुळाशी जोडणे हा या उत्सवामागील हेतू आहे.