Ganeshotsav Celebration

Ganeshotsav Celebration

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ |
निर्विघ्नं कुरू मे देवः सर्व कार्येषु सर्वदा ||

आपल्या देशात अनेक जाती धर्माचे लोक राहतात. त्यामुळे वर्षभर विविध सण साजरे केले जातात. त्यातीलच एक सणाची, प्रत्येक जण वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतो, तो सण म्हणजे गणेशोत्सव.
गणेशोत्सव हा हिंदू धर्मातील एक महत्वपूर्ण सण आहे. भाद्रपद चतुर्थीस गणरायाचे आगमन होते. गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी पर्यंत सुमारे अकरा दिवस गणेशोत्सव मोठ्या उत्सहात , भक्तिभावाने साजरा केला जातो.

त्याचप्रमाणे गोपाल्स गार्डेन हायस्कूल मध्येही ३० /८ /२०२२ रोजी गणेश चतुर्थीचा उत्सव मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात सत्यानंद प्रभू यांच्या भाषणाने झाली. त्यांनी गणेश चतुर्थीचे महत्व अत्यंत सोप्या पद्धतीने सांगितले. त्यानंतर गणपतीच्या विविध अंगांचे महत्व इयत्ता दुसरीच्या विद्यार्थांनी अतिशय लक्षवेधकपणे सादर केले. त्यानंतर इयत्ता चौथीच्या विद्यार्थींनी ‘सूर निरागस हो’ या गाण्यावर नृत्याचे सादरीकरण केले. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी अथर्वशीर्षाचे पठण केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनीने केले. शाळेत श्री गणेशांची आरासही करण्यात आली होती. मुलांना गणेशोत्सवाची प्रत्यक्ष आनंददायी अनुभूती घेता आली आणि भारावलेल्या या सोहळ्याची सांगता झाली.